हवा आहे मला हाथ
कधी ना सोडणारा साथ
हवी आहेत दोन पाऊले
नेहमी सोबत चालणारी
जीवनाच्या वाटेवरून
कधीही परत ना फिरणारी.
हवं आहे एक मन
माझं मन समजणारं
कधी हलकेच रुसणारं
कधी खुदकन हसणारं
हवं आहे एक हास्य
मनाला वेड लावणारं...

गूगल ऐडवर्ड्स

 
Top