आता काय माझे उरणार,
जाऊ नको दुर अशी,
सांग मला,
तू कधी मला मिळणार ?
... चेहरा माझा पाहू नको,
कि चेहरा मला दाखवूही नको,
जिवनातून तर गेली आहेस,
आता स्वपनातून तरी जाऊ नकोस.
चूक होती माझी, माझीच चूक होती,
तू काहीच केलं नाहीस,
मी पडलो अपार प्रेमात तूझ्या,
तरी तू काहीच केलं नाहीस.
आता जीव द्यायची तयारी आहे,
आता मरण्याची सुद्धा घाई आहे,
जा, वाट पाहणार नाही मी तुझी,
असं सांगून करत आहे,
फसवणूक स्वःताची.
जीव तर तू घेतलास,
आता ह्या शरीराचं काय करू,
तूच सुचव मला,
कि मी आता जगू का मरू
कि मी आता जगू का मरू..