वेड मात्र तुझे आहे

झोप माझी असली तरी
स्वप्न मात्र तुझे आहे
रंग माझे असले तरी
चित्र मात्र तुझे आहे

ह्रदय माझे असले तरी
ध्यास मात्र तुझा आहे
नजर माझी असली तरी
भास मात्र तुझा आहे

शब्द माझे असले तरी
वर्णन मात्र तुझे आहे
वेडा मी असलो तरी
वेड मात्र तुझे आहे

आयुष्य माझे असले तरी
त्यावर हक्क फक्त तुझा आहे
पूर्ण नसलो जरी मी
अपुर्ण मात्र तुझ्या मुळेच आहे
वेड मात्र तुझे आहे वेड मात्र तुझे आहे Reviewed by Hanumant Nalwade on March 07, 2011 Rating: 5
Powered by Blogger.