चल आपण आज आपली
दोस्ती साजरी करूया .

फ़ुलपाखरांच्या पंखांवरचे
रंग होऊन उडूया,
आभाळाच्या निळाईवर
ढग होऊन फ़िरूया.
फ़ुलांमधून, पानांमधून
निसर्ग होऊन झुलुया;

चल आपण आज आपली
दोस्ती साजरी करूया !

कधी हंसू, कधी रूसू;
हे तर होतच राहील ;
राग, लोभ, रूसवे, फ़ुगवे,
सार्‍यांचीच मैफ़ील सजेल,
महिन्यांमधून, वर्षांमधून
कदाचित्‌ संपर्क तुटेल ;
जीवनाच्या मार्गांमधे
जुने - नवे घडेल - बिघडेल .........

आज मात्र आपण गंभीर
चिंतन दूर ठेवूया ---------

चल आपण आज आपली
दोस्ती साजरी करूया !!

गूगल ऐडवर्ड्स

 
Top