एक असावा मित्र सख्खा ...
एक असावा मित्र सख्खा
तो नेहमी असावा जवळ
प्रत्येक अवघड,सोप्या गोष्टीला
असावा आपल्या सोबत ......

मधल्या सुट्टीत माझ्याकडे
पैसे नसले तरी स्वताच्या
कॅन्टीन च्या खात्यातून
वडा पाव,कटिंग पाजणारा
असावा एक मित्र सख्खा ......

शाळेतील तोंडी परीक्षेला वही
जरी नसली माझी कम्प्लीट
लगेच माझ्या नावाचे sticker
लाऊन बाईना देणारा
असावा एक मित्र सख्खा .....

परिक्षेच्या आधी मला अभ्यास
कर असे ओरडून-ओरडून सांगणारा...
मला जरी काही आले नाही,तर स्वताचा
अभ्यास सोडून मला समजावणारा ....
असावा एक मित्र सख्खा .....

प्रत्येक रविवारी असावा सोबत
पिक्चरला जाताना,नसले
पैसे दोघांकडे तरी करूया
काहीतरी setting असे
म्हणणारा....
असावा एक मित्र सख्खा ....

प्रत्येक सुटीच्या वेळी क्रिकेट
खेळताना १ली batting मला देणारा
out असलो तरी आणखी एक चान्स देणारा....
असावा एक मित्र सख्खा.......

गूगल ऐडवर्ड्स

 
Top