अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे

तिला म्हणालो, मला आजकाल झोप येत नाही काय करु , तुझी आठवण मला झोपूच देत नाही
क्षणभर विलम्ब न करता तिने तिची पर्स उघडली झोपेची गोळी काढून,माझ्या हातावरती दिली.
...... काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे. अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

मी म्हणालो , माझ्या प्रत्येक श्वासात तुझाच गंध आहे. रक्ताच्या प्रत्येक थेंबास, तुझ्या प्रेमाचा रंग आहे.
ती म्हणाली ,धीर धर अजुन थोडासाच उशीर आहे . उद्या आमच्या रुग्नालयात मोफ़त रक्ततपासणी शिबीर आहे.
...... काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे. अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

मी म्हणालो , तुझ्यासाठी काहीही करु शकतो. माझ ह्रुदय काढून, तुझ्या हाती धरु शकतो.
त्याक्षणी ती उठली, आणि आत निघून गेली . माघारी येताना हाती"डिसेक्शन बोक्स" घेवून आली.
..... मित्रांनो अशी ही, माझी वेगळीच केस आहे. अहो ! प्रेयसी माझी, एम .बी.बी.एस आहे.
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे Reviewed by Hanumant Nalwade on February 28, 2011 Rating: 5
Powered by Blogger.