माझी आई

माझी आई
लहानपणी घास भरवते...न्हवु घालते,
काळजी घेते पिला सारखी..
तेव्हा जाणवते ... माझी आई...!!

सकाळी उठल्यावर टॉवेल पासून डब्यापर्यंत..
माझ्यामागे अखंड घरभर फिरते..
तेव्हा जाणवते ... माझी आई...!!

मोठे होता होता..
नवीन संस्कारांचे बीज रुजवते..
तेव्हा जाणवते..... माझी आई...!!

हसत हसत घरकाम करते..
प्रेमाने मधेच टपली मारते..
तेव्हा जाणवते ... माझी आई...!!

सर्वाना डबा करून स्वता: कामावर जाते
पण मधून मधून फोन वर चौकशी करते...
तेव्हा जाणवते ... माझी आई..!!

तिचे काम करून राखराखीत झालेले हात.
जेव्हा रात्री कपाळावरून प्रेमाने फिरवते..
तेव्हा जाणवते ..... माझी आई..!!


कोणाला दुखले खुपले की
आई ला आधी वाईट वाटते...
तेव्हा जाणवते ... माझी आई...!!

स्वता: चा त्रास बाजूला ठेऊन...
इतरांसाठी झटत असते ..
तेव्हा जाणवते .... माझी आई...!!

मुलं मोठी होतात, त्याना शिंग फुटतात..
दुसर्‍यांमुळे ते आईला विसरतात
तेव्हा जाणवते का ... माझी आई ??

स्वता: शनोशौकित social होतात..
आईला मात्र घरात ठेवतात...
तेव्हा जाणवते का ..... माझी आई ??

नंतर कधीतरी ,आपली चुक कळते..
घरी येताना आईची नजर च
Previous Post Next Post