Wednesday, December 4, 2013

मी प्रश्न मी मीच उत्तर

“कधी ओंजळीत, मी कधी पानांवरती कधी संथ मी, कधी मी लाटांवरती
कधी डॉळ्यांतुनी मी कधी श्वासातुनी झरतो, ओघळतो मी गालांवरती”
......मी प्रश्न मी मीच उत्तर......

कधी माझ्यासाठी मीच प्रश्न, कधी माझ्यासाठी मीच उत्तर
कधी मी प्रश्न, कधी मी उत्तर किती प्रश्न मी कितीसा उत्तर?

कधी चुकवले होते मीच मला, कधी शिकविले होते मीच मला
कधी प्रश्नासाठी, त्या प्रश्नापोटी कधी बदलले होते मीच मला

कधी मी माझ्यातच सापडलो, कधी मी माझ्यातच अवघडलो
कधी उत्तरात इथे मी बडबडलो, कधी मी प्रश्नाआधीच गडबडलो


कधी देतो मी, कधी मागतो कधी विचारतो, कधी सांगंतो
कधी शोधतो मी कधी लपवतो कधी मी सुत्रांसकटच हरवतो

कधी उगाच मी इथे थांबतो ओळी-ओळीत इथे मी लांबतो
पान मागचे मी उलटुन घेतो अन, तिथं स्वतःलाच मी पाहतो

चुकतो कधी मी कधी बरोबर कधी खोटं-खोटं कधी खरोखर
लेखणीतुनी मी खोल मनाच्या कधी थेंब-थेंब कधी येतो झरझर

मी माझे अक्षर मी सुत्र माझे मी शब्द माझा हे मित्र माझे
आरंभ मीच मी अंत माझा इथं प्रयोग मी, मीच पात्र माझे
Reactions: