आई साठी काय लिहू

आई साठी काय लिहू
आई साठी कसे लिहू
आई साठी पुरतील एवढे
शब्द नाहीत कोठे
आई वरती लिहीण्याइतपत
नाही माझे व्यक्तिमत्व मोठे

जीवन हे शेत तर आई म्हणजे विहीर
जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर
जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी

आई तू उन्हामधली सावली
आई तू पावसातील छ्त्री
आई तू थंडीतली शाल
आता यावीत दु:खे खुशाल

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं तसं ठंडगार पाणी

आई म्हणजे आरतीत वाजवावी
अशी लयबध्द टाळी
आई म्हणजे वेदनेनंतरची
सर्वात पहिली आरोळी
आई साठी काय लिहू आई साठी काय लिहू Reviewed by Hanumant Nalwade on February 27, 2011 Rating: 5
Powered by Blogger.