बारा वाटा फुटणारी गंजगोलाई लातूर,

शाळेच्या पाखरांचा किलबिलाट लातूर,

काय करलालूस बे म्हणत मैत्रांची भन्नाट मैफल लातूर,

मेस मध्ये जेवता जेवता अवचित आठवणारं- घरचं तूप रवाळ लातूर,

मांजरेच्या वहाणा-या पाण्याची सोबत लातूर,

सांस्कॄतिक सनई चौघड्‌याची नौबत लातूर,

रमेश ची पाणीपूरी, संजयचे पोहे लातूर,

आमंत्रणची इडली अन्‌ संगमची भेळ लातूर,

बाहेरगावी शिकायला जाताना जेव्हा डॊळ्‌याआड होतं लातूर,

तेव्हा लायब्ररीच्या कट्‌यावर एकटेच असताना आठवणीत रेंगाळणारं लातूर.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top