बरोबर ना

कोणी आपलं सोडून गेल्यावर, खुप दुःख होते मनाला,
समजुन घेतच नाही कोणी मन आपलं, विरह देऊन जाते एकांतात रडायला.....

खुप समजुत काढतो समजुन ही घेतो, रडतानाही तिला हसवण्याचा प्रयत्न करतो,
तरीही भावनानांची कदर न करता, आपली साथ सोडते कधीच न परतायला.....

सर्वकाही सहन करुनही, दोशी आपणच ठरतो प्रत्येक वेळेला,
ती मात्र खुशाल निघून जाते, एकटं टाकून तिच्या आठवणीत झुरायला.....


ढसाढस रडतो हसणेच विसरुन जातो, कुणाचीही साथ मिळत नाही,
तिला पहायला धडपडत असतो, क्षणोक्षणी मरत मरत जगायला.....

का कोणी समजुन घेत नाही, का कोणी आधार देत नाही,
मतलबी होतात सगळे, नाते बदलतात प्रत्येक वेळेला.....

शेवटी एकटेच पडतो आपण, आठवणीत तडफडतो आपण,
मनापासून बोलायच तर, खरं प्रेम कळतच नाही कुणाला.....

खरं प्रेम कळतच नाही कुणाला....बरोबर ना ??
बरोबर ना बरोबर ना Reviewed by Hanumant Nalwade on December 16, 2013 Rating: 5
Powered by Blogger.