Saturday, October 12, 2013

तूचं का ती

माझ्या काँलची
वाट पाहणारी, माझ्याशी एक क्षण बोलण्यासाठी, धडपड करणारी.....

तूचं ना ती ???

मी भांडलो की रडणारी, माझ्याशी बोल ना रे, म्हणून मागे लागणारी.....

तूचं ना ती ???

मी तुझ्या सुःखासाठी, काहीपण करेन रे, म्हणून समजूत घालणारी.....

तूचं ना ती ???

अरे लग्न केले ना तर तुझ्याशीचं करेल, म्हणून मला स्वप्न दाखवणारी..

तूचं ना ती ?????

आता म्हणतेस जे झाले, ती माझी चूक होती, आता विसरून जा मला म्हणणारी.....

तूचं ना ती ???

अरे मी मस्करी केली, आता माझा विषय, डोक्यातून काढ म्हणणारी.....

तूचं ना ती ?????

आधी आयुष्याशी स्वप्ने दाखवून, आता अर्ध्यावर सोडून जाणारी.....

तूचं ना ती ?????

कुण्या दुस-या मुलासाठी मला सोडून, एकटा जगायला भाग पाडणारी, आयुष्यभर झुरायला लावणारी.....

तूचं ना ती ?????

एवढा जीव लाऊन पण, माझी न होणारी.....

तूचं का ती ?????

कधीतरी माझ्यावर, जीवापाड प्रेम करणारी.....

तूचं का ती ??? तूचं का ती ???
Reactions: