कधीच विसरता नाही आले मला.. तुझ माझ प्रेम एकेक शपथ सांजेची..
कधीच दाखवता नाही आले मला.. व्रण मनावरचे अन तडफड हृदयाची..
कधीच बोलता नाही आले मला.. न वेळ येऊ दिलीस कधी शब्दांना बोलण्याची..
कधीच आता घराबाहेर निघता नाही आले मला.. सांजवेळी किनाऱ्यावर आठवण तुझी आधी येयची...
कधीच तू मागे वळून नाही पाहिलेस मला.. न मी अपेक्षा केली होती तू मागे पाहण्याची..
कधीच आता सजले सरण बोलवणारे मला.. तरीही मन गुंतले तुझ्यात...
वेडे आहे न ते... आजही त्याला आस आहे...एकदा तुला शेवटच बघण्याची..
कधीच..कधीच... पण तू!!!
जाऊदे ग सये.. तू नाही समजायची... तू तेव्हा ही नाही समजलेस मला..
मग तू आज कुठून मला ओळखायची..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top