अंतरी ऊरून आहे

आठवते आपली ती पहिली भेट
एकमेकांकडे बघण्यासही लाजलो होतो
हळूहळू नजर एकमेकांकडे वळताच
आपण जागेपणीच निजलो होतो
आठवते आपली ती पहिली
... भेटतुझं ते पावलोपावली अडखळणं
तेवढचं एक निमित्त पाहून
तुजपाशी माझं आधार देण्यासाठी वळणं
आठवते आपली ती पहिली भेट
पुन्हा भेटण्यासाठी किती आतूर झालेलो
तेव्हा म्हणालीस तुझ्या जिवनात
मी एक खास भेट म्हणून आलेलो
आठवते आपली ती पहिली भेट
मन कसं चंदना सारखं दरवळलं होतं
स्वप्नांचे कोवळे दव झेलत मनात
प्रेम कसं हिरवळलं होतं
आजही ती पहिली भेट
माझं मन गच्च धरुन आहे
जरी नसलो तुझ्या कपाळावर
तरी तुझ्या अंतरी ऊरून आहे..
Previous Post Next Post