प्रेमाचं नाव.

असंच राहू दे ना आपलं नातं त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया
आहोत ना एकमेकांसाठी खास मग एकमेकांना घाव नको देऊया
कधी उदास असू,तर कधी खुदकन हसता येईल, त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!!

हृदयामध्ये थोडी अशी जागा जीवनाच्या वाटेवर दमलोच कधी, तर तुझ्या सोबतीने बसता येईल,
पण ज्या छळतील आपल्याला अशा आठवणींचा गाव नको देऊया,
असंच राहू दे ना आपलं नातं , त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!!

प्रेमात नेहमी दुःखच असते . मग कश्याला त्या दु:खाच्या वाट्याला जाउया
प्रेम आहे न दोघात हे फक्त आपल्या नजरेला कळू देउया
असंच राहू दे ना आपलं नातं त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया !!
आहोत ना एकमेकांसाठी खास मग एकमेकांना घाव नको देऊया !!
प्रेमाचं नाव. प्रेमाचं नाव. Reviewed by Hanumant Nalwade on July 07, 2013 Rating: 5
Powered by Blogger.