कोण सांभाळणार..

तो: काय ग...आज रडलीस वाटत? कोणाशी तरी भांडलीस वाटत?

ती: तुला कस कळाल?

तो: हो कि नाही ते सांग...

ती: हो रे.... पण तुला कस कळाल?... सांग ना...

तो: कळाल कस तरी...

ती: सांग ना... कस कळत रे तुला, माझे डोळे पाणावलेले ते?...

कस कळत रे तुला, आज मीखूप हसली ते?...

कस कळत रे तुला, आज मीकोणाशी तरी भांडलीते?...

अन कस कळत रे तुला, आज मीखूप खूप रडली ते?....

कस कळत रे तुला माझमन?...

कशी कळते रे तुला, तुझी येणारी ती आठवण?...

कस कळत रे तुला, आज मीआहे खूप उदास?...

अन कस कळत रे तुला, माझ्याकडे आहे आज , तुला सांगायला काही तरी खास?...

सांग ना... मला भेटताच, कस ओळखतोस रे तू हे सगळ?...

सांग ना... कस कळत रे तुला, माझ्या मनातल सगळ?...

तो: अग वेडे... मला नाहीतर कोणाला कळणार....

तुझहे कोवळ मन, माझ्याशिवाय कोण जाणणार...

प्रेम करतो न ग मी तुझ्यावर, मग तुझ्या ह्यामनाला, मीनाही तर कोण सांभाळणार...

सांग ना... कोण सांभाळणार............

कोण सांभाळणार.. कोण सांभाळणार.. Reviewed by Hanumant Nalwade on July 20, 2013 Rating: 5
Powered by Blogger.