डोळ्यांत तुझ्या पाहिलं की.....
आरश्यात पहावसच वाटत नाही.....
ह्रदयात तुझ्या राहते मी.....
आत्ता घरी रहावसच वाटत नाही....

गालावरची खळी पाहिली की....
हसू थांबवावसच वाटत नाही....
खुप आनंदी असलास की....
आनंद ओसरावासाच वाटत नाही....

जवळ असलास माझ्या की....
तुझा सहवास नसावासाच वाटत नाही....
खुप करतोस प्रेम माझ्यावर....
माझं प्रेम आटावसच वाटत नाही....

तुझी आठवण येणार नाही....
असा दिवस यावसाच वाटत नाही....
चांदण्या रात्रीचं रम्य स्वप्न....
स्वप्न तुटावसच वाटत नाही....

गूगल ऐडवर्ड्स

 
Top