आपल्या बरोबरच का होतं

असं नेहमी आपल्याबरोबरच का होतं??
पहिल्यांदा सर्वाप्रमाणेच शाळा बोअर वाटतं

अचानक एक दिवस तो गोड चेहरा वर्गात येतो
आणि अख्खी शाळा लाईफ बदलुन जातो

मग पकाऊ लेक्चर असले तरी वर्गात बसावेसे वाटते
Result येत नसला तरी practicalकरावेसे वाटते

लायब्ररीमध्ये तासन् तास भुर्रकन उडून जातात
पुस्तकातली नाही तरी मनातली चार पाने वाचुन होतात

Extra lecture ठेवले तरी आपली त्याला ना नसते
आता तर रविवारी पण शाळेमध्ये यायची तयारी असते

असे करता करता......शाळेची वर्षे निघून जातात
जाता जाता डोळ्यामध्ये मात्र विरहाची आसवे देऊन जातात.....
Share on Google Plus

About Hanumant Nalwade