मराठी Girlfriend.

मराठी Girlfriend ची ठळक वैशिष्ट्ये....
१. जर तिची ओळख तुम्ही "माझी Girlfriend" म्हणून करून दिली तर ती रागावते.
२. चारचौघांसमोर जर तुम्ही तिला मिठी मारली तर ती "जन गण मन" गायला सुरु करते.
३. तिच्या आईला आपण "मावशी" किंवा "काकू" म्हणतो.
४. सम

जा जर भयंकर जोराचं वादळ सुटलं आणि विजा कडाडल्या, तर हिंदी सिनेमातल्या नायिकेप्रमाणे ती तुम्हाला कधीच मिठी मारणार नाही.
५. तुमच्याबद्दल जर तिला कोणी विचारले तर लाजेने ती लालबुंद होते.
६. ती सहसा जीन्स आणि टाइट टी शर्ट वापरत नाही पण हे मात्र गॄहीत धरून चालते की तिचं करिअर तुमच्या करिअरइतकंच महत्त्त्वाचं आहे.
७. तिला शाळेतल्या सगळ्या कविता आठवतात.
८. ती नेहमी "अमके अमके" सरांबद्दल बोलते.... आणि तुम्ही मनातल्या मनात म्हणता...." काय पकवते आहे".
९. राखी पौर्णिमेच्या दिवशी ती तुम्हाला भेटत नाही.
१०. तिचा भाऊ कधीच तुमचा मित्र नसतो.
११. घरात तुमच्या आवडीचा पदार्थ केलेला असेल तर ती आठवणीने डब्यात घेउन येते.
१२. तुमची DATING कुठल्या तरी रेस्तौरन्त मधे नसून चतुर्थीच्या दिवशी लालबागच्या राजा किंवा सिद्धीविनायकाच्या मंदिराजवळ असते ...
Share on Google Plus

About Hanumant Nalwade