एक मैत्रीण नेहमी हवीहवीशी वाटणारी  नेहमी सतावणारी त्रास देणारी आणि
रोज मेसेज ची वाट बघायला लावणारी... एक मैत्रीण नेहमी हवीहवीशी वाटणारी.....
नेहमी मधुर मधुर गप्पा करणारी अन गप्पा मारत असतानाच
मधेयचं गालावर खळी पाडणारी... एक मैत्रीण नेहमी हवीहवीशी वाटणारी
बोलण्यात तिच्या गुंग करणारी वेळेची हि कमी भासवणारी...
आपल्यापनाची जाणीव करून देणारी एक मैत्रीण नेहमी हवीहवीशी वाटणारी.....
पाहताच तिला नयनांना हि भुरळ पडणारी चेहऱ्यावरील बट हळूच सर्काव्णारी
चुटकीसरशी आपले बनवणारी एक मैत्रीण नेहमी हवीहवीशी वाटणारी.....
स्वप्नांच्या दुनियात रमणारी आकाशात झेप घेणारी
तरीही जमिनीशी नातं जोडून असणारी अशीच एक मैत्रीण नेहमी हवीहवीशी वाटणारी.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top