प्रेमाला तोड नाही.

तिच्या माझ्या प्रेमाला तोड नाही कशाची
कीतीही चमकला इंद्रधनू तरी
सर नाही त्याला तिच्या नखाची
वसंत ही बहरत असेल पण तिच्या सारखी तीच
केसात माळत नाही फुल कधी
पण बहरलेली तीच श्रावण कधी आला कधी गेला
हे मला कळतच नाही कधी हसते कधी रुसते
मी मात्र तिच्या शिवाय कुणाला वळून पाहत नाही
तीच माझी दुनिया परीघ प्रेम वर्तुळाचा
चैत्र… वैशाख तीच माझा ऋतू प्रेम पावसाचा..
Previous Post Next Post