फक्त तुला भेटण्यासाठी

मी सुदधा खिडकिच्या गजातुन पाउस बघत असतो
"कशी आहे ती सांग ना रे"अस सारख त्याला विचारत असतो.....

तुझ्या सोबत धुन्द भिजलेल्या छळतात त्या सार्‍या आठवणी
तु नाहिस आता सोबत हि जाणीव व्यापुन उरते मनी......

पहिल्याच भेटीचा दिवस डोळ्यासमोर उभा राहतो
चेहरा तुझा मग तासन तास विचारत तरळ्तो.....

वास्तवाच कडेलोटाच भान आल कि खुप त्रास होतो
पण तरीही हे सगळ मी निमुटपणे सहन करतो.....

कारण त्याच्या सोबत तु ही बरसत आहेस अस समजुन
मी नेहमीच मनोमनी ह्या पावसात भिजत असतो.....

फक्त तुला भेटण्यासाठी!!!!!!
Share on Google Plus

About Hanumant Nalwade