जेंव्हा मित्रच मित्राला
अचानक दगा देतो !
तेंव्हा जपलेल्या मैत्रीचा
अक्षरश: भुगा होतो !!

राजकारणात हे सगळे
गृहीत धरले जाते !
गरजवंताला अक्कल नसते
यावरूनच ठरले जाते !!

राजकीय फिक्सिंग क्लास मध्ये
उमेदवार मात्र कच्चे असतात !
ज्यांच्यावरती विश्वास ठेवला
नेमके तेच तर लुच्चे असतात !!

गूगल ऐडवर्ड्स

 
Top