अशी हवी जरी

एक तरी मैत्रीण अशी हवी जरी न बघता पुढे गेलो तरी मागुन आवाज देणारी आपल्यासाठी हसणारी वेळ आलीच तर अश्रूही पुसणारी स्वतःच्या घासातला घास आठवणीने काढुन ठेवणारी वेळप्रसंगी आपल्या वेड्या मित्राची समजुत काढणारी वाकडं पाऊल पडताना मात्र मुस्कटात मारणारी यशाच्या शिखरांवर आपली पाठ थोपटणारी सगळ्यांच्या गलक्यात आपणास सैरभैर शोधणारी आपल्या आठवणीनं आपण नसताना व्याकुळ होणारी खरंच ! अशी एक तरी जीवा-भावाची"मैत्रीण" हवी जी आपणास मित्र म्हणवणारी
अशी हवी जरी अशी हवी जरी Reviewed by Hanumant Nalwade on December 09, 2013 Rating: 5
Powered by Blogger.