तुझ्या डोळ्यातील तेजस्वी हस्ती
तुझ्या हसण्याची बेफिकीर मस्ती
तुझ्या केसांची उडणारी दाट वस्ती
नाही विसरणार मी
जो पर्यंत आहे श्वास जो पर्यंत आहे श्वास
... तुझं हाथातून हाथ काढणं
तुझ्या आत्म्याने रस्ता बदलणं
तुझं पलटून पुन्हा न बघणं
नाही माफ करणार मी
जो पर्यंत आहे श्वास जो पर्यंत आहे श्वास
पावसातील बेधडक तुझ्या नाचण्यावर
प्रत्येक गोष्टीवरून विनाकारण तुझ्या रूसण्यावर

छोट्या छोट्या तुझ्या बालिश खोडयांवर
प्रेम करेन मी
जो पर्यंत आहे श्वास जो पर्यंत आहे श्वास
तुझ्या खोट्या शपथा आणि वचनांचा
तुझ्या जाळणार्या बैचैन स्वप्नांचा
तुझ्या न लाभणार्या प्रार्थनेचा
तिरस्कार करेन मी
जो पर्यंत आहे श्वास जो पर्यंत आहे श्वास.......!

गूगल ऐडवर्ड्स

 
Top