Friday, July 20, 2012

कुणीतरी असावं.

चांदणं शिंपणारं कुणीतरी असावं.
श्वास पंपणारं कुणीतरी असावं.
निराशेच्या उन्हात भेगाळलेलं मन,
प्रेमानं लिंपणारं कुणीतरी असावं.

मनाला भिडणारं कुणीतरी असावं.
हक्कानं चिडणारं कुणीतरी असावं.
माझ्यावर हसणारेच आहेत सारे,
माझ्यासाठी रडणारं कुणीतरी असावं.

स्वप्नांत दिसणारं कुणीतरी असावं.
हळवं रूसणारं कुणीतरी असावं.
संध्याकाळी आभासांचा गाव जागताना,
नसूनही असणारं कुणीतरी असावं...........
Reactions: