ह्यालाच तर प्रेम म्हणतात.

तु माझ्यापासून दूर माझ्या हृदयात आठवणींचे पूर तुझ्या गोड आठवणीच मला
दिवस रात्र स्मरतात ह्यालाच तर प्रेम म्हणतात....

काही क्षण आपण एकमेकांसोबत घालविले कधी मी तर कधी तु मला हसविले पण थोडयाश्या आठवणीही जेव्हा हृदयात खोल रुततात ह्यालाच तर प्रेम म्हणतात....

आपण एकमेकांना भेटलो काही काळ एकमेकांसाठी जगलो स्वतःसाठी न जगताजेव्हा दोन जीव एकमेकांसाठी जगतात ह्यालाच तर प्रेम म्हणतात....

जेव्हा रडू तुला आले की अश्रू माझे वाहायचे जेव्हा हसू मला आले की डोळ्यात तुझ्या चमकायचे दुख असो की आनंद जेव्हा दोघ एकत्र अनुभवतात ह्यालाच तर प्रेमम्हणतात...
.
प्रेम कधीही होऊ शकते कोणावरही होऊ शकते कधी झाडावर तर कधी मातीवर होऊ शकते जेव्हा कुठच्याही नात्याचीमुळे खोलवर रुजतात ह्यालाच तर प्रेम म्हणतात....ह्यालाच तर प्रेम म्हणतात....
Previous Post Next Post