एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची

होती एक मैत्रीण
होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची
होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची
फोनवर माझ्याशी तासंतास बोलत बसायची
माझे PJ सुध्हा ती हसत हसत ऐकायची
तिच्या मनातल सगळच मला सांगायची
सुखांमध्ये मला नेहमीच तिची साथ होती
दुःखांमध्ये मला सावरनारा हात होती
माझ्या सोबत हसायची माझ्या सोबत रडायची
अशी होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची

एक दिवशी अचानक तिने मला भेटायला बोलवल
तिच्या आवाजात थोडस दडपण मला जाणवल
"लग्न ठरलय रे माझ" तिने भेटल्यावर सांगितल
"लग्नाला नक्की ये" अस आहेर माझ्याकडे मागितल
पायाखाली माझ्या जमीन राहिली न्हवती ते ऐकून
थोडावेळ स्तब्ध राहिलो आणि अश्रु टाकले मी पिउन
बिखरलेल्या ह्रुदयाच मात्र कमी होत न्हवत कंपन
खोट हास्य आणून चेहरयावर कसबस केल तिला अभिनंदन

ती गेल्यावर चुक माझी मला उलगडली होती
मीच मैत्रीची पायरी न कळत ओलांडली होती
प्रेम होत माझ तिच्यावर पण तिच्या मनातल माहित न्हवत
म्हणुन प्रेमासाठी मैत्रीचा बळी देन मनाला कधीच पटत न्हवत
नक्की मोठी चुक कोणती? तिच्यावर प्रेम करण की प्रेम व्यक्त न करण
हे माझ्या जीवनातल न उलगड़लेल कोड होत
माझ्या चुकीचे प्रायच्छित बहुदा फ़क्त तिच्या दूर गेल्याने झाल न्हवत
म्हणुनच बहुतेक ते कोड सोडवायला तीच मला पुन्हा एकदा भेटण ठरल होत

ती समोर आली पण सुरवात कुठून करायची तेच ती विसरली
तेव्हा आम्हा दोघांमध्ये जणू बोचरया शांततेची लाटच पसरली
एकमेकांबरोबरच्या प्रवासाचा FLASHBACK डोळ्यांसमोर आला होता
आणि अश्रूंचा उद्र्येक दोघांनीही कसाबसा रोखला होता
"सगळ सांगितल रे मनातल तुला, पण एकच गोष्ट सांगायची राहिली"
"खुप प्रेम केल रे तुझ्यावर आणि तुझ्या विचारण्याची नेहमीच वाट पहिली"
न राहवून तिने तिच्या ह्रुदयाच अस मौन तोडल
आणि न कळतच तिने माझ ह्रदय पुन्हा एकदा मोडल
Previous Post Next Post