वेलकम जिंदगी | Welcome Zindagi


Welcome Zindagi (2015)वेलकम जिंदगी  हा चित्रपट गडद कॉमेडी प्रकारात मोडणारा चित्रपट आहे. यात केंन्द्रस्थानी आहेत दोघं. `वेलकम जिंदगी' या सिनेमातूनस्वप्नील जोशी आणि अभिनेत्री अमृता खानविलकर पहिल्यांदाच एकत्र येताहेत. एक मुलगी जिला जगण्यात स्वारस्यच उरलेलं नाही आणि एक मुलगा, जो तिच्या लेखी जीवनाचा अर्थ बनून जाईल.
वेलकम जिंदगी या सिनेमाची निर्मिती अजित साटम, संजय अहलुवालिया, बिभास छाया यांनी केली असून या सिनेमाचे दिग्दर्शन ऊमेश घाडगे यांनी केले आहे. मराठी रसिकांचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्यासोबत रुपेरी पडद्यावर दिसणार असून त्यांची ही धमाल जोडी रसिकांचे धमाकेदार मनोरंजन करण्यासाठी येत आहेत.

पार्श्वभूमी

जगणे नकोसे वाटण्याचा प्रसंग अनेकांच्या बाबतीत आयुष्यात एकदातरी अनुभवाला येतो. त्यावर मात करणे आवश्यक आहे. आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि प्रत्येक क्षण आनंदात घालवता आला पाहिजे असा संदेश देणारा 'वेलकम टू जिंदगी' हा चित्रपट आहे. यातील गाणी गुरु ठाकूरसह ओमकार मंगेश दत्ता, मंदार चोळकर यांनी लिहिली असून अमितराज, पंकज पडघम यांनी संगीतबध्द केली आहेत. या चित्रपटात मोहन आगाशे, महेश मांजरेकर, प्रशांत दामले यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. २६ जुनला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

उल्लेखनीय

मराठी चित्रपटात अनेक चांगले प्रयोग होत आहेत. देशा विदेशात मराठीचा झेंडा अभिमानाने फडकवणारे नवे दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ या क्षेत्रात येत आहेत. असाच एक नवा विषय घेऊन उमेश घाडगे दिग्दर्शित 'वेलकम जिंदगी' या नव्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. गणेश मतकरी यांनी याचे लेखन केले असून स्वप्निल जोशी आणि अमृता खानविलकर हे प्रमुख भूमिकेत आहे.

कलाकार


  • स्वप्नील जोशी
  • अमृता खानविलकर
  • मोहन आगाशे
  • सतीश वसंत आळेकर
  • प्रशांत दामले
  • भारती आचरेकर
  • राजेश्वरी सचदेव
  • पुष्कर श्रोत्री
  • मुरली शर्मा
  • ऊर्मिला कानिटकर

बाह्य दुवे

वेलकम जिंदगी | Welcome Zindagi वेलकम जिंदगी | Welcome Zindagi Reviewed by Hanumant Nalwade on May 05, 2015 Rating: 5
Powered by Blogger.