Friday, November 22, 2013

प्रियकर लपलेला असतो

प्रत्येक मुलीच्या मनाच्या कोप-यात एक प्रियकर लपलेला असतो...

तिच्या  स्वप्नातला तो राजकुमार असतो.. कधी तो क्रिकेट मधला सचिन, ... ... तर कधी पिक्चर मधला अमिताभ असतो.. लग्न झालेल असुदे किवा नसुदे.. प्रत्येकीच्या मनात एक कोपरा त्याच्यासाठीच असतो... लहानपणी भातुकलीच्या खेळा मधला खोटा खोटा नवरा असतो..  आपल्याच बाहुलिचा होणारा बाप ही असतो.. प्रत्येकीचा मनात एक कोपरा त्याच्यासाठीच
असतो...

खेळातला डाव फक्त  त्याच्या साठी हरायचा असतो.. त्याच्या जवळ फक्त  आपलाच वशिला चालत असतो..
प्रत्येकीच्या मनात एक प्रियकर  लपलेला  असतो |

शाळेत असताना तो वर्गाचा मोनिटर  असतो... कधी फुटबाल तर कधी क्रिकेट टीमच  कॅपटन असतो, डब्यातली पोळी भाजी त्याच्या  बरोबर  शेयर करत.. गृहपाठ सुद्धा त्याचा आपणच पूर्ण  करायचा असतो.. प्रत्येकीच्या मनात एक प्रियकर  लपलेला असतो |

कॉलेज मध्ये तो सर्वात स्मार्ट  मुलगा असतो.. आपल्याच मैत्रिणीचाच नव्हे तर  प्रत्येक मुलीचा तो हीरो असतो.. बाईकवर बसल्यावर काय स्मार्ट  दिसतो... त्यावेळेला तर अमिताभ सुद्धा  त्याच्या समोर फीका वाटतो... प्रत्येकीच्या मनात एक प्रियकर  लपलेला असतो |

लग्न झाला तर तो आपला नवरा.. नाही झालं तर तो आपल्या स्वप्नातला राजकुमारच रहातो.. मग अक्षय, आमिर, सलमानला  बघितल्यावर तो बाहेर येतो..,तर.. कधी सुनील,सचिन, धोनी रोनाल्डला  बघितल्यावर मैदानात उतरतो... प्रत्येकीच्या मनात एक प्रियकर  लपलेला  असतो |
प्रियकरा बद्दल बोलायला लाजतात  त्या जगजनात.. लोक काय बोलतील, समाज काय बोलेल..
ह्याचाच फक्त विचार करतात.. प्रेम करणं गुन्हा नाहीं  मग लपवायचं कशाला ? त्याच्या बद्दल बोलायला
घाबरायचं कशाला ? लग्न झाले म्हणून काय झाले  आपल्या प्रियकरावर त्यांच प्रेम  असतच,आणि तस असलं म्हणून काय नव-यावरचं प्रेम कधी कमी होत नसतं ...
Reactions: