शेवटचा SMS

...........शेवटचा SMS ...........
रोज सकाळपासून त्याची कटकट तिला sms ची
घरातून निघाल्यापासून घरी पोहोचेपर्यंत
तिनेही निक्षून सांगितलं त्याला call नाही करायचा
sms पण कमी कर ऑफिस मध्ये व्यत्यय येतो कामात
त्याला ही इतकी सवय की जमत नव्हतं
सारखा sms करून बेजार करायचं तिला
तो तरी काय करणार सवयीचा परिणाम
त्याची ही खोड जात नव्हती रोजची
काल रात्रीपासून त्याला अस्वस्थ वाटत होतं
छातीत कळ श्वास कोंडत होता सारखा
रात्री त्याने तिला दीड वाजता sms केला "
काही खरं नाही माझं " तिने ही रागाने नं पाहताच delete
केला झोपेतच परत सकाळी कामावर
जाताना त्याचा रस्त्यावर तोल जात होता
डोळ्यावर अचानक अंधारी आली तरी तिला sms
करत होता "कसं तरीच होतंय ! येतेस का ? बस stop वर
आहे वाट पाहतोय pl " कदाचित हा शेवटाचा SMS असेल
माझा please एकदा भेट मला " तसं दोघांचा ऑफिस जवळच होते पण
तिला वाटलं मुददाम नेहमीप्रमाणे खट्याळपणा ह्याचा
तिने ही call नं करण्याची ताकीत दिल्याने sms
त्याने केला तिचा inbox फुल झाल्याने message
डिलिवर नाही झाला इथं तिच्या प्रतीक्षेत तो अचानक
कोसळला तोंडातून फेस एका इसमाने पाहिलं पण
पुढे सरसावला नाही एका महिलेने जवळ येत कुशीत घेतलं पण
कोणीच सावरण्यास त्याला आलं नाही क्षणांत सर्व संपलं !!
संध्याकाळ पर्यंत त्याचा sms आला नाही म्हणून घरी
निघताना तिने INBOX मधील सर्व SMS डीलीट केले
अन लगेच त्याचा पेंडिंग sms आला " पटकन ये !
काही खरं नाही माझं " तरी तिला त्याचं गांभीर्य लक्ष्यात
आले नाही घरी पोहोचल्यावर तिने गुपचूप
त्याला call केला पलीकडून आवाज " तुम्ही ज्या व्यक्तीशी संपर्क
करत आहात आता त्या व्यक्तीशी आपलं संपर्क होवू शकत नाही "
इथे त्याचं प्रेत जळत होतं स्मश्यानात आणि त्याचा mobile ही....
शेवटचा SMS शेवटचा SMS Reviewed by Hanumant Nalwade on January 03, 2014 Rating: 5
Powered by Blogger.