पावसांत चिंब भिजतांना तुझ्या डोळ्यातला निखार मला जाळत होता

तुझ्या ओठांवर थांबलेले अमृताचे थेंब मी पिऊन टाकावे बिनधास्त असा तुझ्या डोळ्यातला

भाव मला सांगत होता दिसत होती आस तुझ्या डोळ्यात मला घे मला मिठीत

जणू एक इशारा मनाला करत होता मीही झालो हतबल घेतले तुला कुशीत

भाळावर चुंबन घेऊन तुझ्या स्पर्शात मी विरघळून जात होता फुललेली हि प्रीत पाहून

पाऊस मुसळधार कोसळत होता पाऊस मुसळधार कोसळत होता .

गूगल ऐडवर्ड्स

 
Top