ती , मी आणि ती एक सायंकाळ

कधी ना विसरणारी ती कधी ना विसरणारा मी
आणि पुष्टच्या आठवणीची ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

अखंड धरती ती अनंत आकाश मी
आणि अस्पर्ष क्षितिजाची ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

न संपणारी रात्र ती न संपणारा दिवस
मी आणि गर्द आसवांची ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

स्वप्नातली राजकुमारी ती स्वप्नातला राजकुमार मी
आणि खरया अस्तीत्वाची ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!


जीवनाची राणी ती मृत्यूचा राजा मी
आणि झुरणाऱ्या जीवांची ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

अर्धवट प्रेमिका ती अर्धवट प्रेमी मी
आणि अर्धवट प्रेम कहाणीची ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

दूर कुठेतरीची सुरवात ती जवळचा अंत मी
आणि दोघांच्या मिलनाची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!
Previous Post Next Post